In our daily routine many times we use english words as is. The website http://www.marathishabda.com/shabda/ is platform to introduce marathi words for them. I have pasted author's preface below as is.
कठीण व उगीचच मोठे असलेले, उदा महाविद्यालय, केशकर्तनालय, मराठी शब्द वापरताना फार त्रास होतो ना? अनेक ईंग्लिश शब्द तर आपण जसेच्यातसे वापारतो. कारण त्यांना पर्यायी शब्दच नाहीत.
तसेच काही वाक्ये वापरताना गोंधळ उडतो. उदा “मी त्याचा वडील आहे” हे योग्य की नाही? मग काय म्हणायला हवे? प्रश्न पडतो..
माझ्या मातृभाषेसाठी मी काहीतरी केले पाहीजे हे नेहमी वाटते ना? चला आपण सगळे मिळून मराठी ला वेगळी ऊंची देउया. ह्या जागेचा वापर करुन आपण ते साध्य करु शकतो.
हे कसे करता येइल ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला एखादा शब्द खटकला की, त्याचे मराठी बारसं कसे करायचे त्याचा विचार करायला सुरुवात करायची. एखादा पर्यायी शब्द सापडला की, ह्या जागेवर येउन, तो दान करायचा. समजा तुम्ही आणि ईतरांनीही काही दानं दिली असतील तर, त्या वेळी मी एक मतं चाचणी घेइन. ज्या पहील्या ३ शब्दांना जास्त मते असतील ते शब्द मी आपल्या शब्द संचयात नोंदवेन.
तुम्ही दिलेल्या दानाबद्दल मी तुम्हाला प्रत्येक निवडलेल्या शब्दाला एक दान देणार. ज्यामुळे तुमच्या “योगदाना” खरे मुल्यं सगळ्यांना ह्या जागेच्या माध्यमातुन दिसेल.
आपला एक सामाजिक कट्टा पण आहे. - http://www.marathishabda.com/forum ह्या कट्ट्यावर बरीच दिग्गज मंडळी तुम्हाला भेटू शकतील. तुम्ही त्याच्याबरोबर चर्चा करू शकता. मतं चाचणी सुध्दा ईथेच घेतली जाईल. ह्या कट्ट्यावर जाऊन तुम्हाला एक “वापरू” बनवावा लागेल.
आता प्रश्न राहीला तो नवे शब्द कसे तयार करायचे ह्याचा. हे पहा- कालच मी एक नवीन शब्द वाचला. हा पर्यायी मराठी शब्द कसा वाटतो पहा.
Ghost fishing: पाताळकोळी, भुत्याकोळी
तुम्हीही असे नवीन शब्द सुचवा. आपण सगळे मिळून नवीन मराठी शब्द तयार करू. नवीन शब्द तयार करण्यासाठी मी काही वाटा (Categories) करतोय, उदा, “घरातील शब्द”. आपण इथून सुरूवात करूया. अजुन पुढच्या सुचना मी देइनच.
चला तर या माझ्याबरोबर…
~ Kiran
1 comment:
marathishabda.com हे कोजळ (वेबसाईट) ज्यांना नवीन मराठी शब्द तयार करायला आवडतात त्यांच्या साठी आहे.
नवीन मराठी शब्द निर्मीती हा एक नुसताच छंद नसुन भाषेचा एक गंभीर अभ्यास व अवघड कला आहे. त्यात भाषेच्या विविध घडणींचा, व्याकरणाचा, सामाजिक जाणीवेचा, लोकांच्या स्पंदनांचा, आधुनिकतेचा, सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे बनते.
त्यामुळे कुठलाही व्यावसाईक हेतु न ठेऊन, हे कोजळ अशा भाषाप्रेमींसाठी निर्मिले आहे की, ज्यांना हे असे करावेसे खुप दिवसांपासुन मनात होते; ज्यांना चुकीचे, उगीचच अवघड असलेले, शब्द वापरतांना खूप यातना होतात अशांसाठी आहे. फक्त एक भाषाप्रेमी ह्या नात्याने “एकत्र” येणाय़्रांसाठी आहे. मराठीचे अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यीक, विद्यार्थी, संस्था, प्रकाशक, भाषाप्रेमी, सर्व प्रकारांची मराठी बोलणारे, कलाकार, सर्वांसाठी आहे.
Post a Comment